उस्मानाबाद : तुळजापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या एका गावाजवळ आपली पिकअप गाडी उभी करुन आरोपी ड्रायव्हर हा काही कामासाठी ऊसाच्या शेतात गेला असता १३ वर्षीय मुलीसोबत आरोपीने बळजबरीने लैंगिक आत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपीला विशेष पोक्सो अंतर्गत उस्मानाबाद कोर्टाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २६ जून २०१८ रोजी सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर १३ वर्षीय मुलगी आपल्या काही कामासाठी ऊसाच्या शेतात गेली असता आरोपी ड्रायव्हर विलास कोंडिबा गलांडे रा. पुळकोटी ता. माण जि.सातारा ऊसाच्या शेतात गेला असता तेथे १३ वर्षीय मुलीला पाहताच आरोपी विलास गलांडे यांने पिडीत मुलीचे तोंड दाबले आणि आरडाओरडा करु नकोस म्हणून मारहाण केली व तोंड दाबून लैंगिक अत्याचार केला. ‘हे कोणाला सांगितले तर तुला जिवंत ठेवणार नाही तुझी जिंदगी खराब करुन टाकेल’ ,असा दम देऊन पोबारा केला.

Live सामन्यात महिला मैदानात घुसली अन् तिच्या टी शर्टने सर्वांचे लक्ष वेधले…
घडलेला प्रसंग पिडित मुलीने तुळजापुर पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितला मुलीच्या तक्रारीवरुन सदरील आरोपीच्या विरुध्द तुळजापुर पोलीस स्टेशनला पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक राजेंद्र बोकडे यांनी तपास स्वःताकडे घेतला. राजेंद्र बोकडे यांनी तपासाची सुत्रे जलद फिरवत पिकअप ज्या ठिकाणी थांबली होती तेथे गेले असता शेजारील पानटपरी चालकाकडे चौकशी केली.

सदरील पिकअपचा ड्रायव्हर याने याच पानटपरी मधून पाण्याची बाटली घेऊन ऊसाच्या शेतात गेला होता. काही वेळाने ड्रायव्हर ऊसाच्या शेतातून धावत आला आणि तुळजापुरच्या दिशेने गेल्याचं सांगितले. मुलीच्या वर्णन वरुन आणि प्रत्यक्षदर्शी यांच्या वर्णावरुन स्केच काढले. स्केच सर्व पोलीस स्टेशनला पाठवले. निरीक्षक डी.डी. बनसोडे यांनी सोलापुर येथे आरोपीला बेड्या ठोकल्या.

२०१४ च्या दगाफटक्याचा बदला घेणार; बंटी पाटीलच धनंजय महाडिकांची राज्यसभा घालवणार?

दरम्यान, या प्रकरणाचा निकाल आज लागला असता सर्व साक्षीदार आणि मिळालेल्या पुराव्याआधारे आरोपी विलास कोंडिबा गलांडे याला सतिष डी. जगताप विशेष पोक्सो न्यायाधीश उस्मानाबाद यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली असून या प्रकरणात विशेष शासकिय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी युक्तिवाद केला आहे.

Apps: प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या फोनमध्ये असायलाच हवे ‘हे’ ५ अ‍ॅप्स, मिनिटात होईल सरकारी काम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here