Nitin Gadkari | पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली होती. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे इंधनाला कशाप्रकारे पर्याय ठरू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केले होते.

हायलाइट्स:
- नितीन गडकरी यांच्या धोरणामुळे साखरेचे उत्पादन २२ टक्के कमी होऊन इथेनॉलचे उत्पादन वाढले
- हेच धोरण दहा वर्षे कृषीमंत्री असताना शरद पवारांना का राबवता आले नाही
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. शरद पवार हे साळसूदपणे शेतकऱ्यांना सांगतात की, साखर कारखान्यामध्ये साखर शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्यावर जे कर्ज काढले जाते त्याच्या व्याजाचा बोजा हा कारखान्यावर पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुकड्यातुकड्याने पैसे घ्यावे, असे शरद पवार म्हणतात. अठरा-वीस महिने शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा असतो एवढे महिने शेतकऱ्यांचे पैसे त्यात गुंतलेले असतात. त्याचे व्याज त्यावर चालू असते. याचा विचार शरद पवार यांच्याकडून केला जात नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले.
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्सिट्यूटमध्ये शनिवारी साखर परिषद पार पडली होती. या कार्यक्रमाला नितीन गडकरी, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी भविष्यात ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे इंधनाला कशाप्रकारे पर्याय ठरू शकते, याबाबत सविस्तर विवेचन केले होते. आगामी काळात फ्लेक्स फ्युएल इंजिनांमुळे पेट्रोल-डिझेलऐवजी १०० टक्के इथेनॉल वापरुन वाहने चालवणे शक्य होईल. देशात सध्या पेट्रोल-डिझेलमध्ये २० टक्के इथेनॉल ब्लेंडिगचे धोरण आहे. हे प्रमाण आगामी काळात वाढल्यास इथेनॉल निर्मितीमधून साखर कारखानदारांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. यामुळे कारखान्यात आलेल्या सर्वच ऊस साखरनिर्मितीसाठी वापरला जाणार नाही. त्यामुळे साखरेचे उत्पादनही आटोक्यात राहील आणि साखरेचे भाव हे स्थिर राहतील, असे गडकरी यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
शरद पवार राजू शेट्टी नितीन गडकरी suger industry suger sharad pawar raju shetty nitin gadkari
Web Title : raju shetty praises nitin gadkari slams ncp chief sharad pawar
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network