मुंबई : टिळक नगर पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली दोन महिलांना अटक केली असून चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. बुधवारी दुपारी या सहाही जणांवर चेंबूरमध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्या भाचीसोबतच्या मैत्रीला विरोध केल्यामुळे बांबूच्या काठीने मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित घरात एकटेच होते. तेव्हा आरोपीने हल्ला केला. शुक्रवारी त्यांचा रुग्णालयातच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे. ४५ आणि ४१ वर्षे वयाच्या या दोन महिलांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर चार अल्पवयीन मुलांना डोंगरी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.

Monsoon 2022: चार दिवस आधीच ‘या’ राज्यात मान्सूनचं आगमन, ५ दिवसात अतिवृष्टीचा इशारा

पोलिसांनी सांगितले की, मयत प्रकाश वाघमारे आणि इतर कुटुंबीयांना त्यांच्या १६ वर्षीय भाचीची अल्पवयीन आरोपींपैकी एकाशी असलेली मैत्री आवडत नव्हती. तरुणीची गोवंडीतील एका मुलाशी (१६) इन्स्टाग्रामवरून मैत्री झाली आणि त्यांची भेट होऊ लागली. मात्र, मुलीच्या घरच्यांना ते आवडले नाही आणि त्यांनी तिला मुलगा आणि त्याच्या मित्रांना न भेटण्यास सांगितले.

यामुळे मनात राग धरुन आरोपींनी प्रकाश यांना मारण्याचा प्लान आखला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलीस सध्या प्रकरणाच्या कसून तपास करत आहेत. तर भाचीचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे.

झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने वाढवले टेन्शन; अशी आहे मुंबईतील ताजी स्थिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here