हिंगोली : हिंगोली ते औंढा नागनाथ रस्त्यावरील दिग्रस फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. हिंगोलीकडून औंढा नागनाथच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव कारने त्याच दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. मात्र सुदैवाने यावेळी कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील चौघे सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरजा येथील एक ट्रॅक्टरचालक हिंगोली येथून ट्रॅक्टरचे साहित्य खरेदी करून गावाच्या दिशेने जात होता. मात्र अचानक पाठीमागून कारने धडक दिल्याने ट्रॅक्टरचे व साहित्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. एम. एच. ३८ एक्स ००३२ असा कारचा नंबर आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.

‘मराठी माणसाला चॅलेंज करायचे नाही’; राज ठाकरेंचा पठ्ठ्या ठरलेल्या दिवशी अयोध्येत पोहोचलाच

भरधाव कार चालवल्याने जमावाकडून मारहाण होण्याच्या भीतीने कारचालकासह इतर प्रवाशांनी अपघातस्थळावरून पळ काढला. त्यामुळे अपघाग्रस्तांची नावे कळू शकली नाहीत.

दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून अपघातांचे सत्र सुरू असून २५ ते ३० जणांनी अपघातात जीव गमावला आहे. अनेक कुटुंबातील तरुण युवक रस्ते अपघाताचे बळी ठरले आहेत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याने अपघात होत असल्याचं बोललं जात आहे.

वऱ्हाडाच्या पिकअपने टर्न घेतला आणि अख्ख वऱ्हाड रस्त्यावर कोसळलं, गाडी तशीच पुढे निघून गेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here