औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुका जवळ येऊ लागल्याने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या पाणीप्रश्नावर राजकारण तापलं आहे. तोच आता आम आदमी पार्टीदेखील औरंगाबाद मनपाच्या सर्व जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेत केली.
निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराला पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल येणार असल्याची माहिती यावेळी दिली. पक्षाची पुर्ण तयारी झाली असून सर्व कार्यकर्ते निवडणुकीसाठी तयार असल्याची माहिती माहाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक यांनी दिली आहे.