मुंबई:बॉलिवूडचा बादशहा, किंग खान अशी ओळख कमावलेल्या शाहरूख खान गेल्या चार वर्षात एकाही सिनेमात दिसलेला नाही. त्याच्या चाहत्यांना त्याला पडदयावर पाहण्याची खूप उत्सुकता आहे, पण शाहरूखचा नवा सिनेमा रिलीज होण्याचं नावच घेत नव्हता. आता मात्र शाहरूखने त्याच्या चाहत्यांसाठी धमाकेदार ट्रीट आणली आहे. येत्या १ जुलैपासून पुढच्यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत शाहरूख पडद्यावर सिक्सर मारण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचे एक दोन नव्हे तर सहा सिनेमे प्रदर्शित होणार असून त्यात शाहरूख खान वेगवेगळया भूमिकांमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे २०१८ साली प्रदर्शित झालेल्या झिरो या सिनेमात शाहरूख दिसला होता. हा सिनेमा फ्लॉप झाल्याने शाहरूखलाही आता एका हिटची गरज आहे.
‘संजना’फेम रुपाली भोसलेचा पाहा रोमँटिक अंदाज, शेअर केला Video
रॉकेट्री द नांबी इफेफ्ट

आर. माधवन याचा रॉकेट्री द नांबी इफेक्ट हा सिनेमा चर्चेत आहे. आता शाहरूखमुळेही या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा येत्या १ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. इस्त्रोचे वैमानिक आणि भारतीय अभियंता नंबी नारायण यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे. या सिनेमात शाहरूख खान पाहुणा कलाकार म्हणून दिसणार असला तरी त्याची भूमिका महत्वाची आहे.

ब्रम्हास्त्र
रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या केमिस्ट्रीमुळे गेल्या पाच वर्षापासून जोरदार चर्चा असलेला ब्रम्हास्त्र सिनेमा येत्या ९ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमातील कलाकारांच्या यादीत शाहरूख खान या नावाने लक्ष वेधलं आहे. सिनेमाच्या टीझर प्रदर्शनानंतर शाहरूखही या सिनेमात दिसणार असल्याची चर्चा आहे. या सिनेमात शाहरूख एका संशोधकाच्या भूमिकेत चाहत्यांना पहायलाम िळणार आहे.

पठाण
शाहरूखचा नवा सिनेमा कधी येणार या चर्चेत सर्वाधिक नाव होतं ते म्हणजे पठाण या सिनेमाचं. अॅक्शन आणि थ्रिलर असा हा सिनेमा शाहरूखच्या नावावर चालेल असा दावा केला जात आहे. प्रमुख भूमिकेत दिसणारा शाहरूख चार वर्षानंतर याच सिनेमातून जोरदार पुनरागमन करणार आहे. २०२३ च्या २५ जानेवारीला पठाण पडदयावर येणार आहे. या सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत.
जेव्हा राष्ट्रपतींकडून कमल हासन यांना मिळालेला पुरस्कार, पण तरीही दु:खी होता कलाकार
जवान
जवान या सिनेमातूनही पुढच्यावर्षी शाहरूख खान त्याच्या चाहत्यांना दर्शन देणार आहे. जोरदार अॅक्शनपट असलेल्या सिनेमातील शाहरूखचा डॅशिंग लुक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. तमिळ दिग्दर्शक एटली कुमार आणि बॉलिवूडचा किंग खान यांची जोडी यानिमित्ताने पहिल्यांदाच जमणार आहे. पुढच्यावर्षी २ जूनला सिनेमा पडदयावर येणार असून एकाच वेळी कन्नड, तामिळ, तेलुगू या भाषांमध्ये जवान सिनेमा रिलीज होणार आहे.

डंकी
पठाण या सिनेमाने शाहरूख पुढच्यावर्षीची सुरूवात करणार आहे तर डंकी या शाहरूखच्या सिनेमाने वर्षाच्या अखेरीलाही बादशहाच्या चाहत्यांना पर्वणी मिळणार आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकी सिनेमा २२ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूसोबत शाहरूख या सिनेमात स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमात विक्की कौशलही आहे. विक्की आणि शाहरूख खास मित्रांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हर्षाली मल्होत्राच्या त्या ७ गोष्टी, ज्या तिला इतर बालकलाकारांपेक्षा वेगळं बनवतात
टायगर ३
सलमान खानच्या करिअरमध्ये टायगर या सिनेमाचं खास स्थान आहे. टायगर च्या पहिल्या दोन सीझननंतर तिसरा सीझन कधी येणार याची प्रेक्षक वाट बघत होते. तसं पहायला गेलं तर सलमान आणि शाहरूख ऑफस्क्रिन फार दिसत नाहीत, पण हीच संधी दोघांच्याही चाहत्यांना पुढच्यावर्षी मिळणार आहे. नव्या वर्षाची ईद या दोघांच्या चाहत्यांसाठी मुबारक ठरणार आहे. टायगर ३ सिनेमात शाहरूख खानची वर्णी लागली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ या जोडीसोबतच किंग खानचा या सिनेमातील लुक चर्चेचा विषय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here