नेमकं काय घडलं होतं?
कोपरगाव तालुक्यातील आपेगावगावजळ भुजाडे कुटुंब शेतात राहते. त्यांची दोन मुले उच्च शिक्षित असून पुण्यात नोकरीनिमित्त राहतात. ते आपल्या आई आणि वडिलांना सोमवारी (३० मे) पासून फोन करत होते. मात्र त्यांचा फोन उचलला जात नव्हता. त्यामुळे आई-वडील शेताच्या कामात असतील असे मुलांना वाटले. मात्र दोन दिवस होऊनही ते आपला फोन उचलत नाहीत, म्हणून शंका आली. त्यामुळे त्यांनी बुधवारी आपला चुलत भाऊ पोपट भुजाडे यांना फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले.
चुलत भाऊ पोपट भुजाडे यांच्या घरी गेला. तेथे त्यांच्या घराला कुलूप होते. त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले, मात्र आत काहीही दिसले नाही. त्यानंतर पोपट भुजाडे यांनी छतावर जाऊन पाहिले असता तेथे दोघांचे मृतदेह आढळून आले. पोलीस पाटील सुदाम शिंदे यांच्यामार्फत ही माहिती पोलिसांना कळवण्यात आली. स्थानिक पोलीस, नगरचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आणि त्यानंतर या घटनेचा तपास सुरू करण्यात आला होता.
शवगृहात ठेवलेला मृतदेह घरी नेला, आक्रोशही झाला, पण स्मशानात नेण्यापूर्वी जे घडलं त्याने डॉक्टरही हादरले