हे वाचा-IIFA सोहळ्यात स्वत:च्या वेणीच्या प्रेमात अभिनेत्री सई ताम्हणकर; शेअर केला स्पेशल हॅशटॅग
या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडच्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यात सन्मान मिळवल्यानंतर तिचे विशेष कौतुक होत आहे. सोशल मीडियावर युजर्स तिचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट करत आहेत. सईला मिळालेला पुरस्कार मराठी सिनेसृष्टीला आनंद देणार आहे.
२०२१ साली ‘मिमी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar Mimi) यांचे असून क्रिती सेनॉन यात मुख्य भूमिकेत होती. सरोगसी हा विषय हाताळणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांसह समिक्षकांकडून वाहवा मिळवली होती. यामध्ये अशी कहाणी दाखवण्यात आली आहे की, मिमी अर्थात क्रिती काही कारणास्तव एका विदेशी जोडप्याच्या बाळाची सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेते, पण त्यानंतर ते जोडपे तिला कोणताच प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे मिमी स्वत:ची स्वप्न बाजूला सारत त्या बाळाचा सांभाळ करते. मिमीच्या या संपूर्ण प्रवासात ‘शमा’ अर्थात सई ताम्हणकर हिने साकारलेले पात्र तिच्यासह असते. सईला याच भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

सई ताम्हणकर हिने जिंकला ‘सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री’चा पुरस्कार
यंदाच्या आयफा सोहळ्याचे (IIFA 2022) चे आयोजन युएई याठिकाणी करण्यात आले होते. शनिवारी अबूधाबीमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात सलमान खान, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या रॉय, विकी कौशल, हनी सिंग, ए आर रहमान, जिनिलिया डिसूझा, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर या कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. बॉलिवूडचे अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.