sangli accident news today: चौपलसीट जाताना भीषण अपघात; तिघे मित्र जागीच ठार तर एक गंभीर जखमी – accident on the way to the four seater three friends were killed and one was seriously injured sangli news
सांगली : दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये तीन जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. जत तालुक्यातील कोसारी इथं हा अपघात झाला आहे. चौघे मित्र एकाच मोटरसायकलवरून जतहून कोसारीकडे येताना हा दुर्दैवी अपघात घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित नेताजी भोसले, मोहित शिवाजी तोरवे आणि राजेंद्र भाले अशी ठार झालेल्या मित्रांची नावं आहेत. तर संग्राम विक्रम तोरवे हा जखमी आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कोसारी येथील अजित भोसले व त्याचे मित्र एकाच मोटरसायकलवर चौघे जण शनिवारी जतला गेले होते.हे चौघे रात्री उशिरा गावाकडे परतत होते. मुंबईत करोनाची आकडेवारी वाढली, जूनच्या ४ दिवसांत मार्चच्या तुलनेत दुप्पट प्रकरणं समोर… दरम्यान, या झालेल्या अपघातात तिघे ठार झाले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. विजयपुर गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील बिरनाळ नजीक असणाऱ्या धोकादायक वळणावर ओढा पात्रानजीक मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने गाडी घसरून हा अपघात झाला. ज्यामध्ये अजित भोसले हा जागीच ठार झाला तर जखमी मोहित तोरवे, राजेंद्र भाले, संग्राम तोरवे या तिघांना बिरनाळ येथील ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील गंभीर जखम झालेले मोहित शिवाजी तोरवे (वय २१), राजेंद्र भाले (वय २२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर संग्राम विक्रम तोरवे ( वय-१६) याच्यावर उपचार सुरू आहेत .एकाच वेळी तिघा मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याने कोसारी गावावर शोककळा पसरली आहे.