जळगाव : चोपडा तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर दरोड्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलीस गेल्यानंतर थरारक नाट्य घडलं आहे. दरोडेखोर आणि चोपडा ग्रामीण पोलिसांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. यात एका दरोडेखोराने पोलिसावर हल्ला करत ‘तुझ्यात दम असेल तर पकडून दाखव’ असं आव्हान देत पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी वेगवान तपास करत या घटनेतील चार आरोपींना अटक केली आहे.

चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत लासूर ते सत्रासेन रस्त्यावर उत्तमनगर गावाजवळ असलेल्या घाटात सहा दरोडेखोरांनी दहशत माजवून दरोडा घालण्याच्या प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

सासवडमधील दुहेरी हत्या प्रकरणाच्या तपासात नवा ट्विस्ट; तपास अधिकारी बदलला

मिळालेल्या माहितीनुसार, ४ जून रोजी उत्तमनगर गावाजवळील घाटात रविंद्र वसंत खारगे, जिजाबा मल्हारी फाळके, चांदपाशा अजिज शेख, जयेश लक्ष्मण भुरूक आणि पळून गेलेला इसम सतनामसिंग महारसिंग जुनैजा हे आरोपी दरोडा घालण्याच्या उद्देशाने पूर्वतयारीत होते. त्यांच्याकडे पोलिसांना एक पिस्तुल आढळून आलं आले. यावेळी पोलीस कर्मचारी मनोज दुसाने यांनी सतनासिंग जुनैजा यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिस कर्मचारी दुसाने यांच्यावर हल्ला करून पळ काढला.

दरम्यान, याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज अशोक दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे हे करत आहेत.

पोलीस स्टेशन आहे की हळदीचा मांडव ? पोलीस ठाण्यात बर्थडे सेलिब्रेशन करत पोलिसांचा झिंगाट डान्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here