कोल्हापूर : पुईखडी येथे कार २५ फूट खोल दरीमध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोल्हापूरातील दोन तरुण जागीच ठार झाले, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार दरीत कोसळल्याची माहिती आहे. शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) आणि शंतनू शिरीष कुलकर्णी (वय २८ रा. मोरेवाडी, ता. करवीर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून संकेत बाळकृष्ण कडणे (२१ रा. खाडीलकर गल्ली, गावभाव, सांगली), सौरभ रविंद्र कणसे (२६ रा. राजारामपूरी ६ वी गल्ली) अशी जखमी तरुणांची नावे आहेत. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
या दुर्घटनेत शुभम सुतार व शंतनू कुलकर्णी हे दोघे जागीच ठार झाले. तसंच संकेत कडणे व सौरभ कडणे हे दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, घरातील तरूण मुले गमावल्याने सुतार आणि कुलकर्णी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून या दुर्घटनेबाबत माहिती मिळताच दोन्ही कुटुंबांनी मोठा आक्रोश केला.