लातूर : लातूरच्या राजकारणात समाजकारणात वेगळी छाप असणारे, लोकांच्या कार्यासाठी सतत झटणारे बहारदार व्यक्तिमत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लातूरचे माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष एस.आर.देशमुख (काका) यांचे ५ जून रोजी रविवारी सकाळी ७ वाजता पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी ६ जून रोजी सकाळी १० वाजता लातूर येथील मारवाडी स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे. एस.आर.देशमुख हे दिवंगत विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय होते. एस. आर. देशमुखांना विलासराव देशमुखांचा सच्चा साथीदार म्हणून ओळखले जात असे.
दिवंगत एस आर देशमुख यांच्या पश्चात ४ भाऊ, ३ मुली १ मुलगा असा मोठा परिवार आहे एस आर देशमुख (काका) यांच्या दुःखद निधनाने विकासाचा महामेरू हरवला आहे, अशा भावना शहरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.