नाशिक : राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच घोडेबाजार हा शब्दही चर्चेत आला आहे. राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेशी मते नसल्याने त्यांच्याकडून घोडेबाजार केला जाण्याची शक्यता आहे, असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

‘राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत असल्याचा आरोप असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून माहिती घेऊन पोलिसांनी बाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करावी. या प्रकरणात मुख्यमंत्री आणि सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घेऊन कारवाई करावी. आमदारांना घोडे म्हणण्याचं काम गाढवच करू शकते,’ असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.

इनोव्हा कार दरीत कोसळली: मित्रांवर काळाचा घाला; २ ठार, अन्य दोघे जखमी

सोमय्या यांना कांदा देण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

राज्यभरात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील एका शेतकऱ्याने कांद्याचा प्रश्न सुटत नसल्याचा निषेध करण्यासाठी किरीट सोमय्या यांची भेट घेतली. राज्य सरकारच्या बरोबरच केंद्र सरकारनेही कांदा प्रश्नात लक्ष घालावं, अशी या शेतकऱ्याची मागणी होती. सोमय्या यांना कांदा भेट देत आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

‘ठाकरे सरकारचे सर्व घोटाळे बाहेर काढणार’; सोमय्यांचा अनिल परबांना थेट इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here