परभणी : रिकामे प्लॉट नावावर करण्याच्या वादावरून पत्नी आणि पोटच्या मुलांनी आपल्या जन्मदात्या बापाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना परभणीच्या मानवत तालुक्यातील कोथाळा येथे घडली आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. कौशल्या मोगरे, हनुमान मोगरे, गजानन मोगरे, भरत मोगरे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

रिकामे प्लॉट आमच्या नावावर करा…

दशरथ माणिकराव मोगरे हे मागील तीन वर्षापासून पत्नी आणि मुला पासून विभक्त राहतात त्यांच्या नावावर असलेले रिकामे प्लॉट आमच्या नावावर करा असे पत्नी आणि मुलांनी त्यांना म्हटले यावेळी दशरथ मोगरे यांनी अर्धे प्लॉट देतो असे उत्तर दिल्यानंतर पत्नी आणि मुलांनी दशरथ मोगरे यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

‘जो माणूस बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा होऊ शकला नाही तो तुमचा काय होणार?’
पोटच्या तीन मुलांकडून वडिलांना प्रॉपर्टीसाठी मारहाण…

दशरथ मोगरे यांनी मानवत पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी दशरथ मोगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पत्नी कौशल्या मोगरे, मुलगा हनुमान मोगरे, गजानन मोगरे, भरत मोगरे यांच्या विरोधात मानवत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान पोटच्या तीन मुलांनी वडिलांना प्रॉपर्टीसाठी मारहाण केल्यामुळे परिसरामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

आधी स्फोटाचा धमाका, नंतर आगीच्या ज्वाळा, कंटेनर डेपोला आग, ४० जणांचा मृत्यू, ४५० जखमी
मागील काही दिवसांपासून प्रॉपर्टीच्या वादातून मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ…

दरम्यान, मागील काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये प्रॉपर्टीच्या वादातून मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यात शेतीच्या वादावरून मारहाण झाल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर मानवत तालुक्यात देखील अशाच प्रकारे शेतीच्या वादातून मारहाण झाल्याच्या घटना घडल्या असल्याचं समोर आलं आहे.

विलासरावांचा सच्चा साथीदार गेला, देशमुख काकांच्या निधनाने लातूरवर शोककळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here