मुंबई: बॉलिवूडमध्ये मोजके सिनेमे करून लंडनच्या उद्योजक आनंद आहुजाशी लग्न केलेल्या सोनम कपूरकडे सध्या गुड न्यूज आहे. दोघांचे तिघ होणार हे कळल्यापासून सोनम भारतात तिच्या दिल्लीच्या सासरी आली आहे. अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन अशी ओळख असलेल्या सोनम कपूरची गेल्या आही दिवसांपासून चर्चा सुरू आहे कारण ती लवकरच आई होणार आहे. बेबीबम्पसह ती नेहमीच तिच्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता मात्र सोनमला भटकंतीचे डोहाळे लागले असून हे डोहाळे पूर्ण करण्यासाठी सोनम तिच्या पती आनंद आहुजासोबत इटलीमध्ये पर्यटनाची मजा घेत आहे.
गेल्याच महिन्यात काळ्या रंगाच्या ड्रेसमधील तिचे फोटो खूप व्हायरल झाले होते. आता पुन्हा सोनमच्या इन्स्टापेजवर लाइक्सचा वर्षाव होत आहे कारण आई होण्याआधी ती तिची एक इच्छा पूर्ण करण्यासाठी इटलीला गेली आहे. डिलिव्हरी होण्यापूर्वी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मिस्टर अँड मिसेस आहुजा इटलीत धमाल करत आहेत.
सोनम खरंतर गेल्या काही महिन्यांपासून आई होणार असल्याचा आनंद साजरा करत आहे. त्यासाठी ती लंडनवरून दिल्लीच्या घरी राहत आहे. प्रेग्नन्सीमध्येही ती काही प्रोजेक्ट पूर्ण करत असल्याचे तिने सांगितलं होतं. सोशल मीडियावर सोनमच्या प्रेग्नन्सीमधील फोटो आणि व्हिडिओ बघून चाहत्यांनाही आता तिच्या डिलिव्हरीची उत्सुकता लागली आहे.
पहिल्यांदाच आई होत असलेल्या सोनमने हा सोहळा बेबीबम्पसह फोटोसेशन करून साजरा केला. पण एकदा का डिलिव्हरी झाली आणि बाळामुळे तिला पुढचे काही दिवस तरी फिरायला जाता येणार नाही. त्यामुळेच तिच्या मनातील पर्यटनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती पती आनंदसोबत इटलीला गेली आहे.
सोनमने इटलीतील पर्यटनाचे फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये सोनम इटलीतील पूलमध्ये धमाल करतानाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. इटलीतील पर्यटनाच्या फोटोवर तिचे चाहते कमेंट करत आहेत. काहीजण असं म्हणत आहेत की या दिवसात सांभाळून रहा तर काहींनी मात्र तिला असं म्हटलं आहे की हा काळ जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घे.
सोनमने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पूलमध्ये जाण्यासाठी तयारी करत असल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये पूलच्या किनाऱ्यावर मस्त आराम करताना चाहत्यांना दिसत आहे. सोनमच्या प्रत्येक फोटोमध्ये अर्थातच तिचा नवरा आनंद आहुजा तिच्यासोबत आहे आणि तिची खूप काळजी घेत आहे. २०१८ ला सोनमने तिचा बॉयफ्रेंड आनंद आहुजाशी लग्न केलं आहे. सध्या हे दोघंही त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या नव्या पाहुण्याची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.