मुंबई: करोनाचा धोका कमी झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये सगळं काही आलबेल सुरू आहे. पण आता याच बॉलिवूडमधील ५५ जणांना करोनाची लागण झाली आहे. २५ मे रोजी दिग्दर्शक निर्माता करण जोहर याने ५० व्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती. गेल्या चार दिवसात सेलिब्रिटी कलाकारांना करोना झाल्याच्या बातम्या धडकत असून त्यापैकी बहुतांशी कलाकार हे करण जोहरच्या पार्टीला हजर होते. कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर, शाहरूख खान यांच्यापाठोपाठ आता कतरिना कैफलाही करोनाची लागण झाली आहे. गेल्या वर्षीही कतरिनाला करोना झाला होता, आता दुसऱ्यांदा तिला क्वारंटाइन व्हावं लागलं आहे.

मोठी बातमी! अभिनेता शाहरुख खानला करोनाची लागण, करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीत केला होता डान्स
करोनामुळे सर्वाधिक नुकसान बॉलिवूडला झालं होतं हे तर सर्वांनाच माहिती आहे. गेल्या दोन वर्षात शूटिंग थांबलं होतं. सिनेमे रिलीज होत नव्हते. थिएटर खुली होत नसल्याने सगळच अधातंरी होतं, पण गेल्या सहा महिन्यांपासून सगळं रूळावर आलं. लॉकडाउननंतर प्रदर्शित होत असलेल्या सिनेमांना यश मिळायला लागलं. पण आता पुन्हा एकदा बॉलिवूडमधील कलाकार करोना पॉझिटिव्ह येत असल्याच्या बातम्या येत आहेत.

अतिउत्साह नडला! करण जोहरची बर्थ डे पार्टी नव्हे करोना हॉटस्पॉट, इतके जण पॉझिटिव्हअभिनेता अक्षय कुमारला पंधरा दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली. त्यानंतर आता बॉलिवूडमधील अनेक कलाकार करोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यामध्ये कतरिना कैफलाही आता करोनामुक्त होईपर्यंत घरात बसावं लागणार आहे. कतरिनाला करोना झाल्यामुळे विकी कौशल यालाही त्याची टेस्ट करावी लागणार आहे. सध्या तो आयफा अॅवार्ड सोहळ्यासाठी आबुधाबीला गेला आहे. सरकार उधम या सिनेमासाठी त्याला आयफा अॅवार्ड मिळालं आहे. एकीकडे अॅवार्डचा आनंद तर दुसरीकडे कतरिनाला करोना अशा कात्रीत ही नवविवाहित जोडी सापडली आहे.

लग्नाला सहा महिने झाल्याच्या आनंदात गेल्याच महिन्यात कतरिनाने विकीसोबत न्यूयॉर्क ट्रीप केली होती. तिथून परतल्यानंतर तिने शूटिंगला सुरूवात केली. विजय सेतुपतीसोबत ती मेरी ख्रिसमस या सिनेमाच्या शूटिंगची तयारी करत होती, मात्र तोपर्यंतच तिला करोनाची लागण झाल्याने आता या शूटिंगला ती जाऊ शकणार नाही. सध्या ती पूर्णपणे क्वारंटाइन आहे. कतरिना गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये करोनाबाधित झाली होती. त्यावेळी तिने उपचार घेतले होते आणि ती पूर्णपणे क्वारंटाइन झाली होती.

कतरिनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या आदल्या दिवशी कार्तिकलाही करोना झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या कार्तिक त्याच्या भूलभुलैय्या २ या सिनेमाला मिळत असलेल्या दणदणीत यशामुळे खुश आहे. त्यातच करोना झाल्यामुळे त्याने ही गोष्टही पॉझिटिव्ह घेतली. इन्स्टावर फोटो शेअर करत त्यानं लिहिलं होतं की आयुष्यात सगळच पॉझिटिव्ह होतय तर करोना तरी मागं का राहील? आदित्य रॉय कपूरला करोनाची बाधा झाली असून त्यानेही ओम द बैटल विदइन या सिनेमाचं प्रमोशन पुढं ढकललं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here