परभणी : ओंकारेश्वर ट्रेडिंग कंपनीच्या भुसार दुकानमध्ये शनिवारी ४ रोजी रात्री साडे आठ ते रविवारी ५ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास दुकानाच्या पाठीमागील पत्रे वाकवून सुमारे ४ लाख ९५ हजार ५०० रुपये किमतीचे १५० कट्टे सोयाबीन चोरून नेल्याची घटना परभणी तालुक्यातील आसोला पाटीजवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याने विरोधात ताडकळस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
आसोला पाटीजवळील शेत शिवारातील शेत सर्व्हे नं. ५० मध्ये भरत हरिभाऊ भरोसे यांच्या जागेवर ओंकारेश्वर ट्रेडिंग कंपनी नावाचे भुसार दुकान आहे. शनिवारी रात्री साडे आठ ते रविवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास कणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील पत्रे वाकवून अज्ञातांनी आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानाच्या पाच पैकी एका शटरचे आतून नटबोल्ट काढून, शटर उघडून दुकानातील सोयाबीनची चोरी केली. यात ५० किलो वजनाचे सोयाबीनचे १५० कट्टे चोरीला गेले असून त्यांचे वजन अंदाजे ७५ क्विंटल आहे. “सेनेच्या पवारांना आस्मान दाखवण्याची रणनीती ठरली, व्यवस्था झाली, फडणवीसांनी प्लॅन सांगितला” सध्याच्या बाजार भावानुसार ६ हजार ५०० प्रति क्विंटल प्रमाणे ४ लाख ८७ हजार ५०० रुपयाचे व तसेच सीसीटीव्हीचा ८ हजार रुपये किंमतीचा डिव्हीआर अशा एकूण ४ लाख ९५ हजार ५०० रुपयांच्या मालावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी कैलास धोंडीराम भरोसे (रा.असोला) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज रविवारी ताडकळस पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४३७, ३८०, ४६२ भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ताडकळस पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय रामोड, सह.पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भारत तावरे, हनुमान ढगे हे पुढील तपास करीत आहेत.