खतरो के खिलाडीच्या १२ व्या सीझनशी जोडलेल्या एकेक रंजक खबरी समोर येत आहेत. या शोमध्ये कोण स्पर्धक असणार याची उत्सुकता आता संपली असली तरी स्पर्धकांच्या खात्यात हा शो किती रूपयांची कमाई टाकणार याची चर्चा जोरात सुरू आहे. यामध्ये जन्नने बाजी मारत श्रीती झा, फैजल खान, इतकच नव्हे तर बिग बॉस १४ फेम रूबीना दिलाइक, आणि लॉक अप शो विजेता मुनव्वर फारूखी यालाही मागं टाकलं आहे. त्यामुळे या शोच्या एका एपिसोडसाठी जन्नत किती मानधन घेते हे ऐकूनच तिच्या कमाईची कल्पना येईल.
खतरों के खिलाडी या नावातच शोची संकल्पना आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचा प्रवास नक्कीच सोपा नाहीय. अतिशय अवघड असे टास्क या शोमध्ये स्पर्धकांना पूर्ण करावे लागणार आहेत. त्यामुळेच जन्नतला जरी एका एपिसोडला तगडं मानधन मिळणार असलं तरी त्यासाठी तिला खूप किंमत मोजावी लागणार आहे.
जन्नतने एका एपिसोडसाठी १८ रूपयांची मागणी केली आणि ती मान्यही झाली आहे. सगळ्या स्पर्धकांपैकी जन्नतचं मानधन जास्त आहे. तिच्यापाठोपाठ मिस्टर फैसूला एका एपिसोडसाठी १७ लाख रूपये मिळणार आहेत. टीव्हीस्टार रूबीना दिलाइक ही देखील या शोमध्ये दिसणार आहे. रूबीना या शोच्या एका एपिसोडसाठी २० लाख रूपये घेत असल्याचीही चर्चा होती, पण सध्या तरी जन्नतचे नाव आघाडीवर आहे.
बिग बॉसच्या १४ व्या सीझनमुळे प्रकाशझोतात आलेली रूबीना दिलाइक हिनेही खतरो के खिलाडीला होकार दिला आहे. रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या शोमधील आव्हानात्मक टास्कपेक्षाही स्पर्धक आणि त्यांचं मानधन हा चर्चेचा विषय आहे. रूबीना, मुनव्वर, फैजल खान यांच्यासोबत जन्नतचा या शोमध्ये चांगलाच मुकाबला रंगणार आहे.