हिंगोली अपघात बातम्या: दुचाकीवरून प्रवास करताना अचानक आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू – heart attack while riding a bike 50 year old man passed away
हिंगोली : हिंगोली-वाशिम या राष्ट्रीय महामार्गावर धावत्या मोटारसायकलवरच हृदयविकाराचा झटका आल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. फाळेगाव पाटीजवळ रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. शेख रशीद शेख कादर असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फाळेगाव येथील रहिवासी असलेले शेख रशीद शेख कादर हे आपल्या दुचाकीवरून (एम.एच ३८. यू ३२४३) पोल्ट्री फार्मच्या कोंबड्या घेऊन जात होते. दरम्यान मोटारसायकल चालवत असतानाच अचानक छातीत दुखू लागल्याने ते मोटरसायकलवरून खाली कोसळले. यावेळी राज्य रस्त्यावर डायल ११२ ही गाडी फिरत असताना त्यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी शेख रशीद यांना हिंगोली रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ‘राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा’
शेख रशीद हे पोटाची खळगी भरण्यासाठी चिकन व्यवसाय करत होते. या व्यवसायातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आपल्या मनमिळाऊ स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या शेख रशीद यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शवगृहात ठेवलेला मृतदेह घरी नेला, आक्रोशही झाला, पण स्मशानात नेण्यापूर्वी जे घडलं त्याने डॉक्टरही हादरले