मिळालेल्या माहितीनुसार, परळमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थित करण्यासाठी शिवडी बस डेपोसमोरील ७५० मिमी व्यासाची आणि १५०० मिमी व्यासाची पाइपलाइन मंगळवारी सकाळी १० ते बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत ६०० मिमी आणि ४५० मिमी व्यासाच्या पाइपलाइनला जोडली जाणार आहे. त्यामुळे शहरांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होईल.
यामुळे केईएम, टाटा, वाडियासह शिवडी (पूर्व व पश्चिम), परळ गाव, नायगाव, शिवडी, वडाळा, अभ्युदय नगर या भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. यासोबतच कुलाबा, सँडहर्स्ट रोड आणि भायखळा परिसरातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, शिवडी पूर्व आणि पश्चिमेसह परळ, अभ्युदय नगर, गोलंजी हिल, काळेवाडी, नायगाव, शिवडी-वडाळा झोनमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
या भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा
दादर, डॉ. आंबेडकर मार्ग, लालबाग, दत्ताराम लाड मार्ग, साने गुरुजी मार्ग या ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आी आहे. म्हातार पाखडी, डॉकयार्ड रोड, रे-रोड, घोडपदेव, बीपीटी आणि माजगाव या भागांत पाणी पुरवठा विस्कळीत असेल.