मालेगाव : जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या तरुणाने थेट डॉक्टरवरच कटरने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात घडली आहे. या हल्ल्यात डॉक्टर थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

किरकोळ मार लागल्याने एक तरूण मालेगावच्या सामान्य रुग्णालयात आला होता. यावेळी डॉक्टर इतर रुग्णांची तपासणी करत होते. मात्र अगोदर माझी तपासणी करून उपचार करा, असं तरुणाचं म्हणणं होतं. त्यावर तुम्ही केस पेपर काढून आणा, असं डॉक्टरने सांगितल्याचा राग आल्याने या रुग्णाने थेट डॉक्टरवरच हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन आरोपी रुग्णाला ताब्यात घेतले.

‘रणजितसिंहांची खासदारकी घालवायला मी मोदी किंवा अमित शहा नाही’

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन

हल्ल्याच्या निषेधार्थ रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून रुग्णालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली. कधी रुग्ण तर कधी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आम्हाला सुरक्षा देण्याची व्यवस्था करा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आधी महिलेवर धावून गेला, नंतर सुनावलं; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा कार्यालयातच राडा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here