पालघर : जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कऱ्हे गावचे सुपुत्र महेश रामा पडवले या जवानाला वीरमरण आले आहे. पंजाब प्रांतातील भारत-पाकिस्तान सीमेवर कर्तव्य बजावत असणाऱ्या महेश रामा पडवले यांना साप चावल्यानंतर उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडले.
दरम्यान, महेश पडवले यांचं पार्थिव रात्री मुंबईत आल्यानंतर आज त्यांच्यावर कऱ्हे या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
सैनिकाच्या अकस्मात मृत्यूनं गावावर शोककळा, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप