मुंबई :मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली होणारी सून राधिका मर्चंटसाठी रविवारी Arangetram सेरेमनी ठेवली होती. यावेळी सिनेमा आणि क्रीडा जगतातले मोठे हस्ती सहभागी झाले होते. हा शानदार समारंभ मुंबईच्या वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित केला होता.

मुंबईत शक्य होतं लग्न, तरी अशोक- निवेदिता यांनी गाठलं गोवा

काय असतो Arangetram सेरेमनी?
Arangetram हा कार्यक्रम म्हणजे क्लासिकल डान्सर पहिल्यांदा स्टेजवर सगळ्यांसमोर परफाॅर्मन्स करते. हा तामिळ शब्द आहे. क्लासिकल डान्सर आपलं ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांसमोर नृत्य साकार करते.

कोण आहे राधिका मर्चंट?
उद्योगपती वीरेन आणि शैला मर्चंटची मुलगी आहे. ती क्लासिकल डान्सर आहे. अनेक वर्ष राधिका क्लासिकल नृत्य शिकतेय. तिचं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तिच्यासाठी Arangetram सेरेमनी ठेवली होती. राधिका मर्चंटच्या परफाॅर्मन्सनं सर्वांचं मन जिंकलं. सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राधिका आणि मुकेश अंबानींचा मुलगा अनंत अंबानीबरोबर २०१९ मध्ये झालेला साखरपुडा
राधिका मर्चंटचा २०१९ मध्ये मुकेश अंबानींचा छोटा मुलगा अनंत अंबानीसोबत साखरपुडा झाला. राधिका अनेकदा अंबानी कुटुंबातल्या कार्यक्रमात दिसते.

मुकेश-नीता अंबानी

आमिर, सलमान आणि रणवीरची उपस्थिती
या कार्यक्रमात सलमान खानपासून रणवीर सिंग, राजकुमार हिरानी, मिजान जाफरी, जहीर खान आणि सागरिका घाटगे हजर होते.

या सोहळ्यात मुकेश अंबानींची मोठी सून श्लोका मेहताही होती. पिंक कलरच्या साडीत श्लोका मुलगा पृथ्वी आणि पती आकाश अंबानीसोबत होती.

महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरेही आपली आई आणि भावाबरोबर उपस्थित होते. Arangetram चे फोटो आणि व्हिडिओज –

सलमान खान नुकताच आयफा सोहळ्यावरून परतला होता. तर आमिर खान लाल सिंग चड्ढा सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सलमानही कभी ईद कभी दिवाली आणि टायगर ३ मध्ये व्यग्र आहे.

सलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी

लाल सिंह चड्ढाचं ट्रेलर लॉन्च, आमिर खाननं घेतला पाणीपुरीचा आस्वाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here