दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे खरं आहे की फार कमी बाबी खटल्याच्या बाजूने निष्कर्षापर्यंत पोहोचतात. आरोपींनी जुगार खेळण्याच्या उद्देशाने पंचतारांकित हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. २०११ मध्ये आरोपीच्या सांगण्यावरून मोठी रक्कम जप्त करण्यात आली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, २००० रुपयांच्या दंडासह ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा पुरेशी होईल, असे माझे मत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
या प्रकरणात, असा आरोप आहे की २७ ऑगस्ट २०११ रोजी, मध्यरात्री नंतर, आरोपी अश्विन भन्साळी आणि संदीप चाळके हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरील खोलीत थांबले होते. तर दोषी आढळलेले इतर सात जणही यात सहभागी म्हणून उपस्थित होते असाही आरोप करण्यात आला.
आरोपींच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी मात्र, पोलिसांनी केवळ आरोपपत्र दाखल केले असून हॉटेल व्यवस्थापकाचे जबाब नोंदवलेले नाहीत. कोणतेही स्वतंत्र साक्षीदार नव्हते, असे बचाव पक्षाने सांगितलं आहे.
न्यायालयाने नमूद केल्यानुसार, खटल्यातील सर्वोत्तम साक्षीदार बहुधा एसीपी किशोर नथ्थू घरटे, छापा टाकणाऱ्या पक्षाचे प्रभारी अधिकारी होते, जे ढोबळे यांच्यासह अन्य दोन एसीपींसोबत घटनास्थळी गेले होते. छापा घालणाऱ्या पक्षात एसीपी स्तरावरील तीन अधिकाऱ्यांचा समावेश होता.