जळगाव :शिवसेना नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील हे जाहीर भाषणांमधील मिश्किल टोलेबाजीसाठी ओळखले जातात. जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमातही त्यांच्या याच स्वभावाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. यावेळी पाटील यांनी थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपदाबाबत भाष्य केलं आहे.

गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी जळगावात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी तुम्ही मुख्यमंत्री व्हायला हवं, अशी भावना एका कार्यकर्त्याने व्यक्त केली. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्री कसा होणार? आधी उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा आणि मग मला मुख्यमंत्री करा,’ असं उत्तर हजरजबाबी पाटील यांनी दिलं. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेना संबंध आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या महाविकास आघाडीवरही जोरदार फटकेबाजी केली.

Rajyasabha Election 2022: शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश

‘आधी शिवसेना-भाजपना युती होती. मात्र नंतर ही युती तुटली आणि इतर तीन पक्ष सत्तेत आले. त्यात शिवसेनेच्या वाट्याला ५० टक्के मंत्रिपदे येतील असं वाटलं होतं, परंतु प्रत्यक्षात १३ मंत्रिपदे मिळाली. यामध्ये सात कॅबिनेट मंत्रिपदे शिवसेनेच्या वाट्याला आली आणि त्यातही माझा नंबर लागला,’ असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here