मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणवीर सिंगची एनर्जी, त्याचा उत्साह सगळ्यांनाच माहीत आहे. पुष्पा सिनेमातून सामंथा रुथ प्रभू या साउथ अभिनेत्रीनं धमाल उडवली होती. आती ही जोडी एकत्र स्क्रीनवर आली तर विचार करा काय होईल ते. असा विचार करण्याचं कारण म्हणजे सामंथानं नुकताच रणवीरसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो पाहून सगळे फॅन्स खूश झाले आहेत. लवकरच दोघं एकत्र दिसणार हा अंदाज येतोच.

तातडीने वाढवली सलमान आणि सलीम खान यांची सुरक्षा

सामंथानं इन्स्टाग्राम अकाउंटवर रणवीरबरोबर फोटो शेअर केला आहे. तो प्रचंड व्हायरल झाला आहे. यात सामंथा पायलटच्या ड्रेसमध्ये दिसतेय. तर रणवीरनं निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. दोघांचं स्मितहास्य पाहून ते किती खूश आहेत, हे कळतं. फोटो समोर आल्यावर फॅन्सही आनंदीत झाले. सूत्रांकडून कळलेल्या माहितीनुसार दोघंही एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहेत.

रणवीर-सामंथा


सामंथानं नाकारला शाहरुख खानचा सिनेमा

सामंथानं बाॅलिवूडचा एक मोठा सिनेमा नाकारल्याची बातमी आली. तो सिनेमा दुसरा तिसरा कुठला नसून शाहरुख खानचा जवान हा होता. आता त्यात साऊथ अभिनेत्री नयनतारा आहे. त्यावेळी सामंथा पती नागा चैतन्यबरोबर फॅमिली प्लॅनिंग करत होती. म्हणून तिनं सिनेमा नाकारला होता.

सामंथा-नागाचं नातं तुटलं

सामंथा आणि नागा २०१० पासून एकमेकांना डेट करत आहेत. Ye Maaya Chesave या सिन्मात दोघं एकत्र होते. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केलं. पण २०२१मध्ये दोघं वेगळे झाले. त्यांनी घटस्फोटही घेतला.

मुकेश अंबानींनी होणाऱ्या सूनबाईसाठी ठेवला Arangetram ;सलमान,आमिर यांची

सामंथा सिनेमात बिझी

पुष्पामुळे लोकप्रिय झालेल्या सामंथाकडे आता भरपूर सिनेमे आहेत. तिनं Shaakuntalam सिनेमा साइन केलाय. ती हाॅलिवूड सिनेमातून दिसणार आहे. तसंच यशोदा सिनेमात ती आहे. शिवाय साऊथचे सिनेमेही तिच्याकडे आहेतच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here