konkan corona news: रत्नागिरीत शासकीय रुग्णालयात मास्कसक्ती, प्रशासानाचे आदेश – mask compulsory in ratnagiri government hospital, administration orders
रत्नागिरी : कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे चिंता वाढली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा प्राप्त झालेल्या अहवालात सहा जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता बाळगत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात मास्क असेल तरच प्रवेश असा नियम लागू केला आहे. तर काही शाळांनीही मास्क सक्तीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
२०७ जणांच्या स्वॅब तपासणीत हे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळले तर एकूण १५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. करोना आल्यापासून ८४५२३ रुग्ण आजवर पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास बेडची उपलब्धतता ठेवण्यात आली आहे. सिद्धू मुसेवालावर गोळ्या झाडणारे दोन शूटर पुण्यातले? तपासात धक्कादायक खुलासे राज्यात वाढत असलेले करोनाचे रुग्ण व येणारी संभाव्य चौथी लाट या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. बस, ट्रेन, ऑडिटोरियम, शाळा, ऑफिस, सिनेमा हॉल्स, कॉलेज, हॉस्पिटलमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीमध्ये करोनाचे फार काही रग्ण नसले तरी खबरदारीचा उपाय म्हणून सिव्हिल सर्जन डॉ.फुले यांनी जिल्हा रुग्णालयासह अन्य शासकीय उपजिल्हा रुग्णालयात प्रवेश करतानाच मास्क सक्तीचा केला आहे.