वाचा-
क्लासिकल गटाच्या आधी झालेल्या ब्लिट्स गटात नॉर्वेचा सुपरस्टार कार्लसनला पराभव केल्यानंतर आनंदने रोमांचक आर्मेगेडोन प्रकारात त्याचा पराभव केला. नियमीत खेळ ४० डावानंतर ड्रॉ झाल्यावर आर्मेगेडोन प्रकारात आनंदने विजय मिळवला. ५२ वर्षीय आनंदने ५० चालीत कार्लसनचा पराभव केला.
वाचा-
कार्लसनवरील विजयासह आनंदचे १० गुण झाले असून तो गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहोचला आहे. स्पर्धेतील अजून चार फेऱ्या शिल्लक आहेत. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जगभरातील सर्व अव्वल संघ खेळत आहेत. आनंदने क्लासिक गटात सुरुवातीला फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियेर लाग्रेव, बुल्गारियाचा वेसेलिन टोपालोव आणि चीनचा हावो वॅन यांचा पराभव केला होता.
वाचा-
आनंदविरुद्ध झालेल्या पराभवानंतर कार्लसन ९.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ब्लिट्ज गटातील विजेता वेस्ली सो हा अजरबैजानच्या शखरियार मामेदयारोवसह संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. या दोघांचे प्रत्येकी ८.५ गुण आहेत.