मुंबई: बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्री सोनाली पाटील नेहमीच चर्चेत असते. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून तिची मजेशीर व्हिडिओ देखील व्हायरल होतात. पण काही दिवसांपासून सोनालीचा व्हिडिओ आला नसल्यानं तिचे चाहते चिंतेत होते. याचं कारण समोर आलं असून काही दिवसांपूर्वी सोनालीचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी सोनालीचा अपघात झाला असून तिच्या हाताला ईजा झाली आहे. तिचा हात फ्रॅक्चर झाला आहे. अपघातानंतर सोनालीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.मात्र, नुकताच तिला डिश्चार्ज देण्यात आलाय. घरी आल्यानंतर मित्र मैत्रिणींनी तिची भेट घेतली आहे.
फाळणीच्यावेळी मुस्लीम व्यक्तीनं सुनील दत्त यांचा वाचवला होता जीव, वाचा काय आहे किस्सा
अभिनेता विकास पाटील यानं नुकतीच सोनालीची भेट घेतली.तिच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर विकासनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ‘एक हात गळ्यात असला तरी ताकद तेवढीच आहे पोरीत…आत्ताही सगळ्यांना लोळवू शकते लवकर बरं व्हा आणि मैदानात उतरा पाटील’, असं विकासनं म्हटलं आहे.


काळजी घेण्याचा सल्ला
विकासनं फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. सोनालीला त्यांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

कोण आहे सोनाली पाटील?
सोनाली पाटील मराठी मनोरंजन सृष्टीमधील नवीन चेहरा असूनही ती लोकप्रिय झाली आहे. सोनाली पाटीलचा जन्म ५ मे १९८७ रोजी झाला. अभिनयाच्या क्षेत्रात येण्याआधी सोनाली लेक्चरर होती. ती एक वरीष्ठ महाविद्यालयामध्ये शिकवत होती. सोनाली महाविद्यालयात शिकत असल्यापासून तिला अभिनयाची आवड होती. त्यामुळेच महाविद्यालयांमध्ये होणा-या विविध नाट्यस्पर्धांमध्ये तिनं भाग घेतला होता.
तातडीने वाढवली सलमान खान आणि सलीम खान यांची सुरक्षा, मिळालेली जीवे मारण्याची धमकी
त्यानंतर सोनालीनं अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. तिनं अरॉन या सिनेमातून पहिल्यांदा अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर सोनालीनं टीव्ही मालिका ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत काम केलं. यामध्ये तिची भूमिका छोटी होती. त्यानंतर तिला ‘वैजू नंबर १’ मालिका मिळाली. या मालिकेत तिला मुख्य भूमिका मिळाली होती . त्यानंतर तिने ‘घाडगे अँड सून’ या मालिकेतही काम केलं होतं. अलिकेडच तिनं देवमाणूस’ या मालिकेतही काम केलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here