जीवे मारण्याची जी धमकी मिळाली आहे त्याविषयी सलमान खानकडून अधिक माहिती घेण्यात आली असून त्याच्याकडून अधिकृत जबाबही नोंदवला जाणार आहे. ५ जून रोजी सलमान आणि सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात FIR (Salman Khan Threaten) देखील दाखल करण्यात आला आहे.
सलीम खान यांना मिळालेलं धमकीचं पत्र
५ जून रोजी सलीम खान यांना सकाळी धमकीचं पत्र मिळाल्याचं वृत्त समोर आलं होतं. सकाळी ७.३० ते ८.०० वाजण्याच्या दरम्यान त्यांना सलमान आणि त्यांच्या नावे हे पत्र मिळालं. हे धमकीचं पत्र असल्याचं लक्षात येताच पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

हे वाचा-Salman Khan च्या डोळ्यांत आलं पाणी,बोनी कपूर यांचे मानले आभार
सलीम खान यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणेच ते मॉर्निंग वॉक संपवून एका बाकावर बसले होते. यावेळी सलीम यांच्या बॉडीगार्डने बाकावर पडलेलं पत्र पाहिलं. हे धमकीचं पत्र असल्याचं सलीम यांना लक्षात येता त्यांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. रिपोर्टनुसार, या पत्रात सलमान खान आणि त्यांचे वडील सलीम खान यांना पंजाबी गायक सिद्धू मूसेवालासारखं (Sidhu Moosewala Murder) मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पत्रात लिहिले, ‘सलीम खान, सलमान खान, लवकरच तुमची अवस्था सिद्धू मूसेवालासारखी होईल.’