रानबाजारच्या टिझरमध्ये तेजस्विनी विवस्त्र होताना दाखवण्यात झाली आहे.तर प्राजक्ता प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. बोल्ड टिझरमुळं तेजस्विनीलाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं. पण तेजस्विनीनं तिच्या शब्दांत ट्रोलर्सला उत्तरही दिलं आहे. तेजस्विनीनं नुकतीच शेअर केलेली एक पोस्टही सध्या चर्चेत आली आहे.
काय आहे तेजस्विनीची पोस्ट?
ऐकून छान वाटतयं !तुम्हाला आयेशा ची कहाणी आवडतेय….बघितली का ‘रानबाजार’ ?असं तेजस्विनीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडित यांच्या भूमिकांबरोबरच या वेब सीरिजला तगडी स्टारकास्ट लाभली आहे. डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, उर्मिला कानेटकर-कोठारे, अनंत जोग, सुरेखा कुडची, वैभव मांगले, निलेश दिवेकर, गिरीश दातार, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे कलाकारही या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका पार पाडत आहेत. ‘रानबाजार’च्या निमित्तानं वेबविश्वात पदार्पण करणाऱ्या अभिजीत पानसे यांनी या थरारपूर्ण वेब सीरिजच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रथमच अभिनेते म्हणूनही त्यांनी मनोरंजनविश्वात यानिमित्तानं पदार्पण केलं आहे.