मीडिया वृत्तानुसार, मायकल लिन युनायटेड स्टेट्समध्ये अभियंता म्हणून OTT प्लॅटफॉर्म असलेल्या Netflix कंपनीत रुजू झाला होता. त्याचा वर्षाचा पगार ३.५ कोटी कमावत होता. अॅमेझॉनमधील नोकरी सोडल्यानंतर २०१७ मध्ये तो नेटफ्लिक्समध्ये वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता म्हणून रुजू झाला. ‘मला वाटलं की मी Netflix आणखी वेळ काम करेन’ असंही त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहलं आहे.
मायकल लिन याने पोस्टमध्ये लिहलं की, “मी वर्षभरात ४५०,००० (सुमारे ३.५ कोटी रुपये) कमावले, दररोज मोफत जेवण मिळालं आणि वेळेचेही पैसे मिळायचे” म्हणूनच, मे २०२१ मध्ये लिनने सोडलं तेव्हा सर्वांना तो वेडा झाला आहे असंच वाटलं
लिन म्हणाले की, “माझ्या पालकांनी सगळ्यात आधी यावर आक्षेप घेतला. त्यांच्यासाठी, मी नोकरी सोडल्यामुळे अमेरिकेत स्थलांतरित होण्याची त्यांची मेहनत वाया गेली. यानंतर माझ्या गुरूंनीही आक्षेप घेतला. मी दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय ही सोडू नये. कारण, पुढच्या नोकरीवर माझ्या पगाराची वाटाघाटी करताना मी माझ्या उच्च पगाराचा फायदा घेऊ शकेन.” असंही त्याने म्हटलं आहे. लिनने यासगळ्याचा विचार करत नोकरी सोडण्याबद्दल व्यवस्थापकाशी बोलण्यापूर्वी तीन दिवस वाट पाहिली होती. पण अखेर त्याने राजीनामान दिला.
पद सोडण्याचा निर्णय का घेतला?
चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय कशामुळे आला याबद्दल बोलताना, लिन म्हणाला की, सुरुवातीच्या काळात नोकरीमुळे त्याला बरंच काही शिकायला मिळालं. सगळ्यांसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता. Netflix वर काम करणं म्हणजे तुम्ही MBA प्रोग्राम्समध्ये शिकत असलेल्या केस स्टडीजवर काम करण्यासाठी मोबदला मिळण्यासारखं होतं. पण करोनाच्या काळानंतर असं काही राहिलं नाही. फक्त कामच राहिलं आहे. यामुळे कंटाळा वाढत गेला आणि त्याचा परिणाम कामावर झाला. म्हणून मायकल यांनी नोकरी सोडली.