आरा: घरात पाहायचा नाही असे कुटुंबीयांनी सांगितल्याने नाराज झालेल्या एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना राज्यातील भोजपूर जिल्ह्यात घडली. ही तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. दरम्यान, पोलिसांनी शवविच्छेदनानंतर तरुणीचे शव कुटुंबीयांकडे सोपवले आहे.

ही घटना भोजपूरच्या उदवंतनगरमधील चौराई गावातील आहे. आत्महत्या केलेली तरुणी १९ वर्षांची आहे. तिला टीव्ही पाहायचा होता. मात्र, घरातील लोकांनी तिला टिव्ही पाहायचा नाही, असे बजावले होते. यामुळे ही तरुणी अतिशय नाराज झाली. त्यानंतर ती आपल्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा आतून बंद करून घेतला.

या घटनेबाबत तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी खोलीत गेल्यानंतर तिला हाका मारण्यात आल्या. मात्र, बराच काळ तिने दरवाजा उघडला नाही. शेवटी कुटुंबीयांना दरवाजा तोडावा लागला. मात्र, दरवाजा तोडल्यानंतर समोरचे दृश्य पाहून सर्वांना मोठा धक्का बसला. या तरुणीने पंख्याला लटकून आत्महत्या केली होती.

या घटनेची बातमी आगीसारखी संपूर्ण गावात पसरली. त्यानंतर लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. तातडीने घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तरुणीचे शव ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर ते अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांना सोपवण्यात आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here