परभणी तालुक्यातील दैठणा येथील अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती सीताराम कच्छवे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून आपल्या शेतीवर १ लाख ५० हजार रुपये कर्ज घेतले होते. मात्र, मागील वर्षी खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. यासोबतच रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत शेतकरी निवृत्ती कच्छवे होते. या वर्षीचा खरीप हंगाम तोंडावर आला असताना बँकेचे कर्ज कसे फेडावे अशी चिंता त्यांना सतावत होती या चिंतेतून त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली.
कछवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर…
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. घरातील कर्त्या पुरुषाने बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत आत्महत्या केल्याने कच्छवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदरील घटनेमुळे दैठणा गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अयोध्येला गेलेला राज ठाकरेंचा पठ्ठ्या मुंबईत दाखल; विमानतळावर जंगी स्वागत