राज्यसभा निवडणुकीत ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात असल्यानं चुरस वाढलीय. शिवसेना आणि भाजपनं निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत होणार आहे.

 

Uddhav Thackeray on Shivsena
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हायलाइट्स:

  • राज्यसभा निवडणुकीची चुरस वाढली
  • शिवसेनेकडून संजय पवार रिंगणात
  • भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी
मुंबई : राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. ६ जागांसाठी ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम असल्यानं चुरस वाढलीय. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या भूमिकेला यामुळं महत्त्व प्राप्त झालंय. भाजपनं पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल पटेल आणि काँग्रेसनं इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी जाहीर केलीय. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्ये लढत होणार आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष आमदारांच्या मतांची जुळवाजुळव सुरु केली आहे. शिवसेनेनं देखील मतं फुटू नयेत म्हणून सतर्कता बाळगलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांपूर्वी घेतलेला एक निर्णय यावेळी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातून छोट्या पक्षांनं दिलेल्या मंत्रिपदामुळं फायदा होणार असून सेनेच्या मतांमध्ये वाढ होणार आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मंत्रिपदांचं वाटप करण्यात आले. शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातील एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद सहकारी पक्षांना आणि अपक्षांना दिली आहेत. सेनेला याच निर्णयाचा या निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आहे.
कोरोनाची लागण पण निवडणूक जिंकण्याचा चंग, देवेंद्र फडणवीसांचे अपक्ष आमदारांना फोन
शंकरराव गडाख यांना शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद दिलं. ते सध्या उस्मानाबादचे पालकमंत्री आहेत. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीचे दोन आमदार निवडून आले होते. बच्चू कडू यांना राज्यमंत्रिपद शिवसेनेच्या कोट्यातून देण्यात आलं. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना देखील शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातून राज्यमंत्रिपद दिलं आहे. त्यामुळं शिवसेनेनं अडीच वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाचा फायदा राज्यसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.
टी-२० वर्ल्डकप संघात स्थान मिळवण्याची अखेरची संधी; पाहा कोण आहेत ते ३ खेळाडू
पालघर जिल्ह्यातील डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे देखील शिवसेना पुरस्कृत आमदार म्हणून काम करत आहेत.
वसंत मोरेंच्या खंद्या शिलेदाराचा पक्षाला रामराम, पुणे मनसेला पुन्हा हादरा 92000494

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajya sabha election 2022 uddhav thackeray decision gave ministerial post to small allies will be game changer in election
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here