पुणे : दारूचे पैसे मागितल्याच्या रागातून बार कामगार आणि मालकावर कोयत्याने वार करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी ४ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हडपसर येथील परमिट रुम आणि बारमध्ये घडली. सागर आटोळे (वय २०, रा. वजन काट्याजवळ, गणपती मंदीर, वडकी) आणि तन्मय बेडगे (वय २३, रा. ससाणेनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यांच्याविरोधात बारमालक दिनेश रघुपती नल्ला (वय ४०, रा. गुरुवार पेठ) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्यासह बार कामगार लक्ष्मण झिंजुर्डे या हल्ल्यात जखमी झाला आहे. हडपसरमधील अमरसिद्धी कॉम्प्लेक्समध्ये फिर्यादींचा बार असून तिथे कामगार लक्ष्मण झिंजुर्डे काम करतो.

अनाथ मुलांना कर्ज वसुलीची नोटीस; अर्थमंत्री सितारामन यांनी ‘एलआयसी’ला फटकारले
या बालकामगाराने आरोपी सागरकडे दारू आणि पाण्याच्या बाटलीचे पैसे मागितले. त्यामुळे संतापून सागरने साथीदाराच्या मदतीने लक्ष्मणला कोयत्याने मारहाण करून जखमी केले. यावेळी बारमालक दिनेश नल्ला यांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांच्यावरही कोयत्याने वार केला. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पडसळकर अधिक तपास करत आहेत.

वसंत मोरेंच्या खंद्या शिलेदाराचा पक्षाला रामराम, पुणे मनसेला पुन्हा हादरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here