गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सहा जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र राज्यात मास्कसक्ती लागू झालेली नाही. मास्कसक्ती नसली, तरीही लोकांनी स्वेच्छेन मास्कचा वापर करावा, असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

हायलाइट्स:
- राज्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव
- सहा जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण वाढले
- मास्कसक्ती नाही, पण मास्क घालण्याचं आवाहन
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड, पालघर या सहा जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रभाव वाढला आहे. बऱ्याच ठिकाणी करोनाचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला आहे. काही ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५, ६, ८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. ही आकडेवारी काळजी वाढवणारी असल्याचं टोपे म्हणाले.
करोना रुग्ण वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं टोपे यांनी सांगितलं. काल रविवार असल्यानं चाचण्या कमी झाल्या. मात्र आजपासून चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं टोपे म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये दर १०० पैकी चाचण्यांमागे ६ ते ८ टक्के चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. या ठिकाणी रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण १ टक्का आहे. सुदैवानं रुग्णांची प्रकृती गंभीर नाही, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
राज्यात मास्कसक्ती लागू करण्यात आलेली नाही. तसा निर्णय झालेला नाही. पण लोकांनी स्वत:हून मास्क घालावा, असं आवाहन टोपेंनी केलं. लोकांनी स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क घालावा. मास्क घातला नाही म्हणून कारवाई होणार नाही. दंड आकारला जाणार नाही. मात्र लोकांच्या स्वेच्छेनं मास्क घालावा, असं टोपे म्हणाले.
करोनाचा नवा व्हेरिएंट अधिक संक्रामक असल्यानं काळजी घेणं गरजेचं असल्याचं टोपे म्हणाले. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं आयोजित केलेल्या पार्टीला अनेक सेलिब्रिटी, बॉलिवूड स्टार्स गेले होते. यापैकी अनेकांना करोनाची लागण झाली. यातून आपल्याला करोनाच्या वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटचा अंदाज येईल, असं टोपेंनी म्हटलं.
करोना रुग्णांमध्ये वाढ; मास्क वापरण्याचं आवाहन | राजेश टोपे
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
राजेश टोपे फेस मास्क सक्ती कोरोना व्हायरस न्यूज कोरोना महाराष्ट्र कोरोना पॉझिटिव्हिटी रेट rajesh tope face mask compulsory corona virus news corona positivity rate corona in maharashta
Web Title : people should use face mask for their safety appeals health minister rajesh tope
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network