पहिल्यासोबत विवाह केल्यानंतर महिला मिस्ड कॉलवरून दुसऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली. आपण अविवाहित असल्याचं सांगून त्याच्याशी विवाह केला. यानंतर इन्स्टाग्रामवरून तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर महिलेनं पळून जाऊन त्याच्याशी लग्न केलं.

 

nagpur women ties marriage not for the third time
प्रतिकात्मक छायाचित्र

हायलाइट्स:

  • नागपुरात एका महिलेचे तीन विवाह
  • दोघे पती महिलेला शोधत पोलीस ठाण्यात
  • पोलिसांसमोर वेगळाच पेच
नागपूर: नागपुरातील एका महिलेनं तिच्याच परिसरात असलेल्या एका तरुणाशी विवाह झाला. काही वर्षांनंतर महिलेच्या मोबाईलवर एका तरुणाचा मिस्ड कॉल आला. त्यानंतर महिला त्याच्याशी बोलू लागली. थोड्या दिवसांत त्याच्याशी सूत जुळलं. यानंतर महिलेनं पतीला सोडून दुसरं लग्न केलं. काही दिवसांनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची ओळख आणखी एका तरुणाशी झाली. यानंतर तरुणानं दुसरं लग्न मोडलं. दुसऱ्या पतीला सोडलं आणि आता तिसऱ्यासोबत राहत आहे. त्यानंतर आता पहिल्या आणि दुसऱ्या पतींनी महिलेविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.

दोन जण महिलेविरोधात तक्रार घेऊन आले होते. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम समोर आला. त्यांच्या तक्रारीनंतर कारवाई केली जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सुर्वेंनी दिली. नागपुरच्या वाठोडात वास्तव्यास असलेले २५ वर्षीय धीरज मिस्त्री म्हणून काम करतात. १८ वर्षांची ललिता (बदललेलं नाव) तिच्या गावाहून मोठ्या बहिणीसह कामाच्या शोधात नागपुरला आली होती. नागपुरात धीरज आणि ललिता यांची ओळख झाली. २ महिन्यांनंतर त्यांनी लग्न केलं. दोघांना एक मुलगा आहे.
राज्यात मास्कसक्ती नाही, पण…; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितला महत्त्वाचा धोका
एके दिवशी ललिताला औरंगाबादमध्ये वास्तव्यास असलेल्या २५ वर्षांच्या पवन यांचा मिस्ड कॉल आला. दोघांमध्ये संवाद सुरू झाला. ललिता पवनच्या प्रेमात पडली. तिनं पवनला नागपुरला बोलावलं. आपण अविवाहित असल्याचं सांगून तिनं पवनला लग्नासाठी विचारणा केली. त्यानंतर पवननं नागपुरात काम शोधलं. आपण गावी जात असल्याचं ललितानं धीरजला सांगितलं. यानंतर ललिता पवनसोबत निघून गेली. दोघांनी मंदिरात जाऊन लग्न केलं आणि मग ते नागपुरातल्या सोनेगावात राहू लागले.
चहावाल्याच्या मुलीने महाराष्ट्राचे नाव उंचावले, खेलो इंडिया गेम्समध्ये काजलने पटकावले सुवर्णपदक
काही दिवसांनी इन्स्टाग्रामवर ललिताची ओळख सचिनशी झाली. ललिताचा दुसरा पती पवन घरी नसताना सचिन तिच्या घरी जाऊ-येऊ लागला. त्यानंतर ललिता सचिनच्या प्रेमात पडली. सचिन ललिताशी लग्न करण्यास तयार झाला. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. यानंतर ललिताच्या पहिल्या आणि दुसऱ्या पतीनं तिचा शोध सुरू केला. ललितानं सचिन नावाच्या तरुणाशी तिसरं लग्न केल्याचं दोघांना समजलं. यानंतर दोघांनी पोलीस ठाणं गाठलं आणि न्यायाची मागणी केली.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : nagpur one arrange marriage second love marriage now living with third
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here