महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना, काँग्रेस पाठोपाठ भाजप देखील त्यांच्या आमदारांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचं कळतंय.
हायलाइट्स:
- राज्यसभेचं काऊंटडाऊन सुरु
- राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरु
- भाजप आमदार ८ जूनला ताज हॉटेलमध्ये पोहोचणार
राज्यसभा निवडणुकीचे रंग आपल्याला दिसू लागले आहेत. प्रत्येक पक्षासाठी राज्यसभा निवडणूक महत्वाची ठरलीय. भाजपकडून त्यांच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. तर, काँग्रेस आणि शिवसेनेनं त्यांच्या आमदारांना मुंबईत बोलवलं आहे. शिवसेना त्यांच्या आमदारांना रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवणार असल्याचं कळतंय. शिवसेना आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असल्याचं कळतंय.
छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचं महत्त्व वाढलं
राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार असल्यानं छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या भूमिकेला यामुळं महत्त्व प्राप्त झालंय. भाजपनं पियूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक, शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार यांना उमेदवारी दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रफुल पटेल आणि काँग्रेसनं इमरान प्रतापगढी यांना उमेदवारी दिली आहे. सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्ये लढत होणार आहे.
शिवसेना आमदार वर्षावरुन निघाले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष आमदारांची बैठक संपली आहे. शिवसेनेसह अपक्ष आमदारांना हॉटेलमध्ये नेण्यात येत आहे. शिवसेना आमदारांनी मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत गप्पा मारल्या. शिवसेना आमदारांना पवईतील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेचे आमदार भारत गोगावले यांनी आमच्या दोन्ही उमदेवारांचा विजय निश्चित असल्याचं म्हटलंय. १० तारखेला मतदान होणार आहे त्या दिवशी आम्हाला टीमवर्कनं निवडणूक जिंकायची आहे, असं सेा आमदारांनी म्हटलं. तर, भाजपच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
शिवसेना राज्यसभा निवडणूक भाजप taj hotel shivsena rajya sabha election ncp mumbai bjp
Web Title : maharashtra rajyasabha elections bjp mla will stay at taj hotel said by sources
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network