मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार यांच्यातील गेली एक तास चाललेली बैठक थोड्याच वेळात संपत आहे. ‘वर्षा’वरुन आमदारांना थेट रिट्रिट हॉटेल इथे नेण्यात येणार आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध पावलं उचलली आहेत. त्यामुळे पुढचे तीन दिवस सेना आमदार मुंबईतील रिट्रिट हॉटेल इथे राहणार आहेत.

राज्यसभा निवडणुकीसाठी आपले २ उमेदवार रिंगणात असल्याने शिवसेनेने जोरदार प्लॅनिंग केले आहे. मतदानासाठी केवळ ४ दिवस राहिलेले असताना वेगवान घडामोडी घडतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावून घेतलं आहे. आता सुरु असलेली वर्षावरची बैठक संपावून आमदारांना हॉटेल रिट्रिट इथे नेण्यात येणार आहे.

Rajyasabha Election 2022: शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश
कोल्हापूरचा एक साधा शिवसैनिक राज्यसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने ही निवडणूक खूप महत्त्वाची झाली आहे. तसेच महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक म्हणजे लिटमस टेस्ट असल्याचं बोललं जातंय. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेना आमदारांना मार्गदर्शन केलं. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत, अनिल देसाई, संजय पवार, सेनेचे सगळे आमदार तसेच काही अपक्ष आमदारही उपस्थित आहेत.
कोरोनाची लागण पण निवडणूक जिंकण्याचा चंग, देवेंद्र फडणवीसांचे अपक्ष आमदारांना फोन
दुसरीकडे फडणवीसांचे अपक्ष आमदारांना फोन

भाजपकडून तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जातायत. त्याचाच भाग म्हणून होम आयसोलेट असलेले देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये आहेत. प्रत्येक अपक्ष आमदाराला ते स्वत: जातीने फोन करत आहेत. भाजपच्या संख्याबळानुसार दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला प्रयत्नांची पराकष्ठा करावी लागत आहे. अशात अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. महाविकास आघाडी आणि भाजपही अपक्ष आमदारांना फोन करुन तसेच भेटून पाठिंब्यासाठी गळ घालत आहेत.

होम आयसोलेट असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अपक्ष आमदारांना स्वत: फोन केले. आपण भाजपच्या उमेदवाराला मत देऊन पाठिंबा दर्शवावा, असं आवाहन त्यांनी अपक्ष आमदारांना केलं. त्यातील काही आमदारांनी संमिश्र प्रतिसाद दिल्याची माहिती सूत्रांकडून कळते आहेत. एकंदरित भाजपच्या कालच्या बैठकीनंतर कोणते अपक्ष आमदार भाजपला पाठिंबा देऊ शकतात, याची लिस्ट तयार असल्याने फडणवीस संबंधितांना थेट कॉन्टॅक्ट करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here