मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत घमासान पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेनेच्या आमदारांची संख्या पाहता दोघांचे अनुक्रमे दोन आणि एक उमेदवार निवडून येतील. मात्र या दोन्ही पक्षांनी अधिकचा उमेदवार दिला आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी जोरदार चढाओढ पाहायला मिळत आहे.

आमदारांची मतं फुटू नये, दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना, भाजपचे नेते कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या आमदारांना मुंबईच्या मढ येथील रिट्रिट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. तर भाजप आपल्या सर्व आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवणार आहे. १० जूनला राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होईल. तोपर्यंत आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये असेल.
मतांची जुळवाजुळव, शिवसेनेची पळापळ, ‘वर्षा’वरुन आमदार थेट ‘हॉटेल रिट्रिट’वर जाणार
आपले आमदार फुटू नये याची काळजी घेत असतानाच शिवसेना, भाजपला लहान पक्ष आणि आमदारांसाठीदेखील मोर्चेबांधणीदेखील करावी लागत आहे. त्यामुळे लहान पक्षाच्या आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा भाव चांगलाच वधारला आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येत असताना अनेक लहान पक्षांनी आणि अपक्ष आमदारांनी त्यांच्यासोबत जाणं पसंत केलं. मात्र या आमदारांनी आताची परिस्थिती पाहून वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे.

बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत ३ आमदार आहेत. समाजवादी पक्षाचे आणि प्रहारचे प्रत्येकी २ आमदार आहेत. तर माकप, शेकापचा प्रत्येकी एक आमदार आहे. या पक्षांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भाजप, शिवसेनेचं टेन्शन वाढलेलं आहे. याशिवाय १३ अपक्ष आमदारांनीदेखील आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळेही शिवसेना, भाजपचे नेते गॅसवर आहेत. आपली भूमिका स्पष्ट केलेल्या छोट्या पक्षांच्या आमदारांची आणि अपरक्ष आमदारांची एकूण संख्या २२ इतकी आहे. याच २२ जणांच्या हाती शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराचं भविष्य आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला जात असला, तरी धाकधूक कायम आहे.

अपक्ष आमदार आमच्याच बाजूने असतील, सतेज पाटलांचा विरोधकांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here