राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार निवडून यावेत यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हायलाइट्स:
- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार चुरस
- शिवसेनेचे संजय पवार निवडणुकीच्या रिंगणात
- मुख्यमंत्री ठाकरेंचा शिवसेना आमदारांशी संवाद
आमदारांची मतं फुटू नये, दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेना, भाजपचे नेते कामाला लागले आहेत. शिवसेनेच्या आमदारांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज वर्षावर संवाद साधला. राज्यसभेची सहावी जागा आपल्याला जिंकायची आहे आणि आपण ती जिंकणारच आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या बैठकीला काही अपक्ष आमदारदेखील हजर होते.
शिवसेनेनं सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. आपल्याला संजय पवारांना निवडून आणायचं आहे. कट्टर शिवसैनिकांना पक्षाकडून काय मिळतं, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे, असं ठाकरे आमदारांशी संवाद साधताना म्हणाले.
मुख्यमंत्री आमदारांशी संवाद साधत असताना अचानक तिथे एक आंबा पडला. हा आंबा आमदार गीता जैन यांच्या जवळ पडला. त्यांनी लगेच तो उचलला. ते मुख्यमंत्री ठाकरेंनी पाहिलं. पक्षात असलेल्या प्रत्येकाला योग्य फळ मिळतं, असं ठाकरे म्हणाले. गीता जैन यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी हा राजकीय पंच मारला.
कोण आहेत गीता जैन?
गीता जैन २०१९ पर्यंत भाजपमध्ये होत्या. त्या मीरा भाईंदरच्या महापौर राहिल्या आहेत. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी त्या पक्षातून बाहेर पडल्या. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्या विजयी झाल्या. यानंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला. वर्षभरानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
‘भाजपने पैसे वाया घालवू नयेत, राज्यसभेची सहावी जागा मविआ सरकार जिंकणार’ | संजय राऊत
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
संजय पवार शिवसेना राज्यसभा निवडणूक गीता जैन उद्धव ठाकरे uddhav thackeray shiv sena sanjay pawar rajya sabha election geeta jain
Web Title : rajya sabha election 2022 everyone gets return at right time says cm uddhav thackeray
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network