dhule lic king: LIC किंग राजेंद्र बंबच्या अडचणीत वाढ; पोलीस कोठडीतला मुक्काम वाढला – dhule lic king rajendra bumb he was remanded in police custody till june 11
धुळे : अवैध सावकारी करून सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या राजेंद्र बंब याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने ११ जुनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्याच्या विविध मालमत्तांची अजूनही तपास यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.
अवैध सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या राजेंद्र बंबची आज पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला ११ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आझादनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध ठगबाजीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतला आहे. यानंतर एकाच वेळी त्याच्याशी संबंधित पाच ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी महत्त्वाच्या कागदपत्रासह ऐवज ताब्यात घेतला. परिणामी न्यायालयाने यापूर्वी त्याला ६ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. राज्यसभा: संजय पवार, महाडिकांचं भविष्य २२ जणांच्या हाती; सेना, भाजप प्रचंड आशावादी या काळात तपास यंत्रणेने त्याच्या विविध बँकांमधील खात्यांची चौकशी करीत त्याने दडवून ठेवलेला सुमारे जवळपास १५ कोटींचा ऐवज ताब्यात घेतला आहे. अवैध सावकारी प्रकरणी राजेंद्र बंब याच्याविरुद्ध आझादनगर पोलिसात नव्याने दोन गुन्हे तर शहर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. आज न्यायालयात हजर केल्यानंतर तपास यंत्रणेने त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.
चिंता वाढली! ठाणेकरांवर कोरोनाचे सावट, जिल्ह्यात आतापर्यंत ९९२ रुग्णांची नोंद गेल्या चार दिवसातील कारवाईची माहिती न्यायालयासमोर ठेवल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. राजेंद्र बंब याला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रडू कोसळले होते. यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा आपल्या ताब्यात घेऊन त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.