मुंबई : “कुणाला घाबरायचं नाही, कुणाला जुमानायचं नाही, आपल्याला कट्टर शिवसैनिकाला आणि संजय राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचं आहे, असं सांगत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील”, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ‘तुम्हाला कोणत्याही ऑफर आल्या, प्रलोभने आली तरी बळी पडू नका. धमक्या आल्या तरी भीक घालू नका’, असा आक्रमक संदेश उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सेना आमदार आणि अपक्ष आमदार यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदारांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह मंत्री आदित्य ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत, अनिल देसाई, संजय पवार आणि सेनेचे सगळे आमदार उपस्थित होते. अपक्ष आमदारांचा वधारलेला भाव पाहता आणि फडणवीसांनी प्रत्येक अपक्ष आमदाराला फोन केल्याचं लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी खास त्यांच्या स्टाईलने पाठिंब्यासाठी गळ घातली.

वर्षावर राऊत-पवारांच्या भविष्याची बैठक, झाडावरुन आंबा पडला अन् मुख्यमंत्र्यांना पंच सुचला
मुख्यमंत्र्यांचं आमदारांना मार्गदर्शन

“कट्टर शिवसैनिकासाठी ही लढाई आपल्याला लढायची आहे. कोल्हापूरचा रांगडा शिवसैनिक पहिल्यांदाच राज्यसभेच्या मैदानात उतरला आहे. कोणत्याही परिस्थितीत संजय पवारांना आपल्याला राज्यसभेवर पाठवायचं आहे. तुम्ही कुणाला घाबरु नका, कुणासमोर झुकू नका, ऑफर प्रलोभनांना बळी पडू नका. धमक्यांना भीक घालू नका. सेनेच्या दोन्ही उमेदवारांमागे ताकदीने उभे राहा,” असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीला उपस्थित सगळ्या आमदारांना केलं.
राज्यसभा: संजय पवार, महाडिकांचं भविष्य २२ जणांच्या हाती; सेना, भाजप प्रचंड आशावादी

बैठकीनंतर सर्व आमदार रिट्रिट हॉटेलकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार यांच्यातील गेली एक तास चाललेली बैठक संपली आहे. ‘वर्षा’वरुन आमदारांना थेट रिट्रिट हॉटेल इथे नेण्यात येणार आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सावध पावलं उचलली आहेत. त्यानुसार आजचा दिवस हॉटेल रिट्रिट इथे आमदारांना मुक्कामी ठेवल्यानंतर उद्या सर्व आमदारांना हॉटेल ट्रायडंट इथे आणण्यात येणार आहे. उद्या शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here