सांगली : जिल्ह्यात एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जत तालुक्यातल्या एकुंडी येथे नवविवाहित तरुणी आणि त्याच्या प्रियकराने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे जत तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. जत तालुक्यातल्या एकुंडी या ठिकाणी एका प्रेमीयुगुलाने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मण संभाजी शिंदे वय २२ व नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी वय २१ अशी त्यांची नावे आहेत.

या दोघांनीही आपापल्या घरामध्ये सकाळच्या सुमारास विषप्राशन करुन आत्महत्या केली आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते, त्यातूनच त्यांनी आपले जीवन संपवलेची चर्चा गावात सुरू आहे. लक्ष्मण शिंदे व अश्विनी माळी दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, पाच दिवसांपूर्वीच म्हणजे १ जून रोजी अश्विनीचा विवाह मिरज तालुक्यातील सलगरे येथील एका तरुणाशी झाला होता.

नडायचं हाय आता भिडायचं हाय, राऊत-पवारांना दिल्लीला धाडायचं हाय, मुख्यमंत्र्यांचा संदेश
लग्नानंतर ती रविवारी एकुंडी येथे आली होती. त्यानंतर सोमवारी या दोघांनीही आपापल्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवले. त्यापूर्वी फोन करून हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. दोघांनी विषारी औषध प्राशन केल्याचे दोघांच्याही घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद जत पोलिसात झाली असून तपास पोलीस करीत आहेत.

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज, दुबईतील ट्वेन्टी-२० लीगमध्ये आयपीएलचे तीन संघ उतरणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here