नवी मुंबई : पावसाळा आला की सगळ्यांनाच छान धबधब्यांवर फिरायला आवडतं. अशात मुंबई, ठाणे, रायगड आणि कल्याणमधूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरण्यासाठी जातात. पावसाळ्यात मुंबईकरांचं आवडतं ठिकाण म्हणजे खारघरमधील पांडवकडा. पण यंदा पर्यटकांना इथे जाता येणार नाही. कारण, पावसाळ्यात होणारे अपघात पाहता खारघर पांडवकडा धरण संकुलात पर्यटकांना येण्यास वनविभागाने बंदी घातली आहे.

पावसाळ्यात धबधब्याचे सौंदर्य पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, रायगड, कल्याण इथून मोठ्या संख्येने पर्यटक खारघर इथल्या पांडवकडा धरणाला भेट देतात. गेल्या काही वर्षांपासून पावसाळ्यात धरणाच्या जोरदार प्रवाहामुळे अनेक लोक वाहून गेले होते. यामुळे वनविभाग दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालते.

Mumbai Water Cut News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, ७-८ जूनला ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
पनवेलमधील वनविभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यंदाही पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. महामारीच्या काळातही पांडवकडा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, गेल्या वर्षी जूनमध्ये बंदी असतानाही खोल पाण्यात पडून गोवंडी येथील एका २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी खारघर पोलिसांनी परिसरात सीआरपीसी कलम १४४ लागू केले होते. वनविभागाने पर्यटकांना इथं येण्यास बंदी घातली होती.

खरंतर, पांडवकडा धरणावर जाण्यासाठी योग्य व्यवस्था नाही. मुख्य भागात जाण्यासाठी पर्यटकांना डोंगर चढून जावं लागतं. यादरम्यान पाण्याच्या जोरदार प्रवाहातूनही जावं लागतं. पावसाळ्यात सर्व नाले ओव्हरफ्लो होतात. त्यामुळे ते ओलांडताना लोक अपघाताला बळी पडतात. यामुळे पर्यटकांच्या जीवाचा धोका पाहता, पांडवकडा यंदाही बंद ठेवण्यात आला आहे.

Weather Update: देशात उष्णता आणि पावसाचा कहर, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना हवामान खात्याकडून अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here