पुढील चार ते पाच दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेची लाट कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. या भागातील बहुतांश भागात पारा ४० ते ४५ अंशांच्या दरम्यान राहू शकतो. मात्र, पारा वाढल्यामुळे काही ठिकाणी जोरदार वारे किंवा गडगडाटी वादळे येऊ शकतात.
खाजगी हवामान एजन्सी स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या काही भागात उष्णतेच्या लाट गंभीर स्वरुप घेऊ शकते. विदर्भ, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या वेगळ्या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला असून उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेणं आवश्यक आहे.
कोल्हापुरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; वाऱ्यासह गारांचा मारा
हवामानाचा अंदाज…
– मुंबईत पाऊस, सिक्कीम, बंगालमध्ये जोरदार पाऊसाची शक्यता
– हवामान खात्यानुसार, कर्नाटक, अंदमान, ईशान्य भारत, तामिळनाडू, केरळ, दक्षिण मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल.
– बंगाल आणि सिक्कीममध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
– ईशान्य भारत, अंदमान आणि निकोबार बेटे आणि केरळ, दक्षिण कर्नाटक आणि किनारी आंध्र प्रदेशात हलका ते मध्यम किंवा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
– केरळ, दक्षिण कोकण आणि गोव्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज.
– ओडिशा, मराठवाडा आणि जम्मू-काश्मीरच्या अंतर्गत भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.