मुंबई : ‘हम लाख छुपाएं प्यार मगर, दुनिया को पता चल जाएगा…’ हे गाणं आता सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालला एकदम सूट होतं. दोघांनी कितीही लपवलं तरीही दोघांच्या प्रेमाची बातमी सगळीकडे पसरलीच. त्यांच्या अफेअरची चर्चा अनेक दिवस सुरू होतीच. पण याबाबत दोघांनीही मौन बाळगलं होतं. पण आता जहीर इक्बालच्या पोस्टमुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. जहीर इक्बालनं सोनाक्षी सिन्हाबरोबर असलेलं रिलेशनशिप ऑफिशियल केलं आहे. सोनाक्षीनंही आय लव्ह यू म्हणत उत्तर दिलं आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या या पोस्टवर फॅन्सपासून सेलिब्रटींपर्यंत सगळेच रिअॅक्शन देत आहेत. जहीरनं सोनाक्षीसोबतचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानं लिहिलंय, ‘हॅपी बर्थ डे. मला मार खावा लागला नाही त्याबद्दल थँक्यू. आय लव्ह यू. पुढेही आपण असेच खात,पित, हसत राहू या.’

सलमानच नव्हे या 7 बॉलिवूड सेलेब्सना गँगस्टरकडून मिळाली होती जीवे मारण्याची

जहीर इक्बाल-सोनाक्षी सिन्हानं एकमेकांना असं केलं प्रपोझ

सोनाक्षीनं जहीरनं शेअर केलेल्या या पोस्टला पाहून उत्तर दिलंय, ‘थँक्यू, लव्ह यू आणि आता मी तुला मारायला येत आहे.’ जहीर इक्बालच्या या पोस्टवर पत्रलेखा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण शर्मा, तारा सुतारिया आणि हुमा कुरेशीसह अनेक सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केला.

सोनाक्षी सिन्हा पोस्ट

डबल एक्सएस सिनेमात जहीर-सोनाक्षी एकत्र
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल Double XL सिनेमात एकत्र असणार आहेत. त्यात हुमा कुरेशीही आहे. जहीरनं सलमान खानच्या द नोटबुक सिनेमातून बाॅलिवूड पदार्पण केलं होतं. मागे एकदा सोनाक्षीनं मुलाखतीत सांगितलं होतं की, ती २० वर्षांची होती, तेव्हा रिलेशनशिपमध्ये होती. नंतर ५ वर्षांनी ब्रेकअप झालं.

करिष्मा कपूरची एक झलकच पुरेशी! तिच्यापुढे फिक्के पडले मौनी, मलायकाचे ग्लॅमरस

जहीर आणि सोनाक्षी गेले अनेक दिवस एकत्र आहेत. काही दिवसांपूर्वी सोनाक्षीनं हातातली हिऱ्याची अंगठीही दाखवली होती. कदाचित दोघांचा गुपचूप साखरपुडा झाला असावा.

कौतुकाचा वर्षाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here