पाटना : हल्ली प्रेमात फसवणूक होत असल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महिलांवरील अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने प्रेमाच्या नावाखाली लज्जास्पद कृत्य केलं आहे, जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. चार मुलांच्या बापाने आधी एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर तिला थेट कॉल गर्ल बनवलं.

आरोपीने प्रेयसी तरुणीचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. हा नराधम इतक्यावरच थांबला नाहीतर त्याने व्हिडिओ सगळ्यांना दाखवून ती कॉल गर्ल असल्याचंही सांगितलं. यानंतर त्याने तिला मारहाण केली आणि धमकावत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं. सगळ्यात भयंकर म्हणजे त्याने तिचं कॉल गर्ल म्हणून हायप्रोफाईल तयार केलं आणि पैसे उळकत तिला पटना, रांची आणि मुंबईलाही पाठवू लागला.

Hea​twave In India : ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उष्णतेच्या लाटेचा इशारा, महाराष्ट्रासह ‘ही’ राज्य अलर्टवर
हे प्रकरण बिहारचं आहे. मोहम्मद अयूब खान असं आरोपी व्यक्तीचं नाव आहे. त्याने पीडित तरुणील प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि तिची फसवणूक केली. त्याने हळूहळू सगळ्या मित्रांना तिचे व्हिडिओ पाठवले आणि तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी पैसे घेऊ लागला.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं तेव्हा तिने यातून बाहेर पडण्याचं ठरवलं. यानंतर तिने दुसऱ्या तरुणाशी विवाह केला. सगळं काही ठीक सुरू असताना अचानक नराधमाने तिला ब्लॅकमेक करणं सुरू केलं. जेव्हा तरुणीने विरोध केला तेव्हा त्याने थेट तिचे अश्लील फोटो तिच्या पतीला पाठवले.

अखेर या सगळ्याचा मनस्ताप झाल्याने पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली. तिने पोलिसांच्या मदतीने सापळा रचत आरोपी नराधाला ताब्यात घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मुंबई आणि ठाणेकरांचं आवडतं ठिकाण पावसाळ्यात राहणार बंद, पर्यटकांमध्ये नाराजी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here