Rajyasabha Election 2022 | तुमचं ते गेट-टुगेदर, आमच्याबाबतीत मात्र लगेच प्रश्न उपस्थित केले जातात, असे संजय राऊत यांनी म्हटले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. १० जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला असेल, असेही राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी आखाती देशांकडून भारतावर केल्या जाणाऱ्या टीकेचा मुद्दाही उपस्थित केला. आजपर्यंतच्या इतिहासात एखादा लहान देश पहिल्यांदाच भारताला माफी मागण्याचा आग्रह धरत आहे.

 

हायलाइट्स:

  • भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनाही एकत्ररित्या हॉटेलवर ठेवण्यात आले आहे
  • फक्त शिवसेनेच्याबाबतीच प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जात आहे
  • राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही अत्यंत तांत्रिक
मुंबई: राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेकडून आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यावरुन भाजपच्या नेत्यांकडून शिवसेनेला डिवचले जात आहे. शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेची बाजू मांडली आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही अत्यंत तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने होते. त्यासंदर्भात आमदारांना मार्गदर्शन करणे गरजेचे असते. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Rajyasabha Election 2022)

यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपला चांगलेच धारेवर धरले. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनाही एकत्ररित्या हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. मग फक्त शिवसेनेच्याबाबतीच प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जात आहे. तुमचं ते गेट-टुगेदर, आमच्याबाबतीत मात्र लगेच प्रश्न उपस्थित केले जातात, असे संजय राऊत यांनी म्हटले. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. १० जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला असेल, असेही राऊत यांनी म्हटले.
Rajyasabha Election: अन् एकनाथ शिंदे शिवसेना आमदारांच्या बसमधून खाली उतरले
यावेळी संजय राऊत यांनी आखाती देशांकडून भारतावर केल्या जाणाऱ्या टीकेचा मुद्दाही उपस्थित केला. आजपर्यंतच्या इतिहासात एखादा लहान देश पहिल्यांदाच भारताला माफी मागण्याचा आग्रह धरत आहे. भाजपने देशात विषारी विचार पसरवले. मात्र, आता त्यांचं आपल्या लोकांवरील नियंत्रण सुटलं आहे. हे लोक धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. कतार, कुवेत, सौदी, इराण आणि मालदीव हे भारताचे शेजारी देश आहेत. पहिल्यांदाच एक छोटा देश भारताला धमकावत आहे. भारतीय राजदूतांना बोलावून देशाकडून माफी मागण्याचा आग्रह धरला जात आहे. या सगळ्या लहान देशांनी मिळून लॉबिंग केलं तर आपल्या व्यापारावर परिणाम होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवणार

वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना सोमवारी रात्री मार्वे बीचवरील ‘द रिट्रीट’ हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना मंगळवारी दुपारी विधानभवनापासून काही अंतरावर असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. शिवसेनेच्या जवळपास २५ आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्याची आल्याची चर्चा आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : sanjay raut explain why shivsena mla’s put in hotel before rajyasabha election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here